मार्क्सवाद आणि संस्कृती
मार्क्सवाद म्हणजे खरे तर शास्त्रीय समाजवाद. त्याचा आणि संस्कृतीचा घनिष्ठ संबंध आहे. मार्क्सने माणसाची व्याख्याच स्वतःला आणि जगाला निर्माण करणारा, अशी केली आहे. निर्मिती ही सर्जनशील गोष्ट आहे. त्यामुळे मार्क्सवादात किंवा शास्त्रीय समाजवादात माणूस सर्जनशील आहे हे गृहीतकच आहे. दि. के. बेडेकर म्हणतात, माणूस हा केवळ समाज-क्रांतिकारक किंवा तर्कशास्त्र- निर्माता नाही तर तो दिव्यकथा-निर्माता, प्रतीक-निर्माताही …